तु प्रेम आहेस माझं,



तु प्रेम आहेस माझं
 
तु प्रेम आहेस माझं,
वाळवंटातल्या हिरवळीसारखं,
मनाला शांत करणारं..
तु प्रेम आहेस माझं,
पहिल्या पावसासारखं,
चिंब भिजावं असं वाटण्यासारखं..
तु प्रेम आहेस माझं,
पौर्णिमेच्या चंद्रासारखं,
माझ्या भावनांना भरती आणणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
अमृतासारखं ,
माझ्या प्रेमाला अमर करणारं..
तु प्रेम आहेस माझं,
गुलाबाच्या कळीसारखं,
नाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..
तु प्रेम आहेस माझं,
इंद्रधनुष्या सारखं,
माझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..
तु प्रेम आहेस माझं

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच



 
तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
 
तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो

तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो


तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो

त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो

तो गंध माझ्या तन -मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो .

रोज होतात आमच्यात छोटी मोठी भांडणं







रोज होतात आमच्यात छोटी मोठी भांडणं

रोज होतात आमच्यात
छोटी मोठी भांडणं
छान तिला जमत
मगच पुढचं उकरून काढणं

समजावून समजावून जातो

दिवस माझा मावळून
ती मात्र एकाच
विषयाला राहते धरून

नाही कधी जमले आपले
नाही कधी जमणार आपले
भांडण्यात दोघेही गुंतले
ब्रेअकप कडे येवून पोहचले

आधी पण होते समजावले
तिने मला आणि मी तिला
ब्रेअकप का नाही होते केले
नाही कळले कधी आम्हाला

भांडता भांडता गेले
दिवसा मागून दिवस
दोघातही नाही कधी आले
ब्रेअकप करण्याचे साहस

ब्रेअकप करता करता
दोघेही एकमेकांत अधिक गुंतले
नाही म्हणता म्हणता
लग्न होते आम्ही केले

प्रेम होते आम्ही केले
खेळ न्हवता मांडला
एकमेकांना समजायला
वेळ होता जरा जास्त लागला

आजही कधी कधी घेईन
घटस्पोट म्हणून भांडतो
काहीतरी आपलेच चुकले म्हणून
एकमेकांची समजूत आम्ही काढतो

आज तो चंद्र वाटू लागला...



 
 आज तो चंद्र वाटू लागला...
 
सार्यांच्याच देखत,
मी आभाळातला चंद्र चोरला...
त्यांच्या नकळत,
त्याला मी एका बरणीत भरला...
सारेच व्याकूळ होऊन,
शोधू लागले त्या चंद्राला...

अन मी फक्त,
तिझ्या बरोबर बसून,
त्यांचा तो खेळ पाहिला....

व्याकूळ झालेली चांदणी,
शोधू लागली नभी तिच्या चंद्राला...
फिरू लागली इथे तिथे,
अन पाहू लागली,
तिच्या त्या जिवलग मित्राला...

तिची ती व्याकुळता पाहून,
हळूच तिच्या (प्रियसी) डोळ्यात पाणी साचल..
अन ज्या चंद्रासाठी,
मी तो चंद्र चोरला,
माझा तोच चंद्रा आज उदास झाला...

तिचा तो उदास चेहरा पाहून,
माझ मन हि उदास झालं...
अन फक्त तिलाच हसवण्याखातर ,
चोरलेला तो चंद्राला,
मी परत आभाळात पाठवलं...

परतलेल्या चंद्राला पाहून,
चांदणी वेड्यागत नाचू लागली...
चांदणीला नाचताना पाहून,
माझा उदास चंद्र,
आता तो ही हसू लागला...
अन आज पहिल्यांदाच,
आभाळातल्या चंद्रा पेक्षा,
मला माझा चंद्र,
खरच खूप सुंदर वाटू लागला...
खरच...
...खूप सुंदर...
आज तो चंद्र वाटू लागला...

तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना



 
 तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना
 
तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना,
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

सकाळचा नाश्ता करताना असो
किंवा संध्याकाळचा चहा पिताना..


drive करत्ताना असो
किंवा मी meeting मध्ये असताना..

जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

येतोस तू हळूच आणि शिरतोस माझ्या मनात..

नाही कळत तुला आता वेळ कुठली आणि आत्ता महत्वाचे काय..

घेरतोस मला तुझ्या धुंद मिठीत..
आणि होते सगळे अवघड स्वताला सावरताना..

जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

तू असलास कि उरत नाहीत कुठल्याच अडचणी..

सगळी संकटे जातात पळून..

घेते मी ओढून बेभान आशेच्या पंखांना..

जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना,
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

कविता केल्या तुजसाठी



 
 कविता केल्या तुजसाठी
 
कविता केल्या तुजसाठी

कशा लिहूं सांग मला

शब्दांमध्ये गुंफल्या तर


आवडतील कां सांग तुला ।

ना यमक ना छंद त्या

शब्द जोडतो पाठोपाठी

भावनांचा हार गुंफतो

फक्त तुझ्या स्मृतिंसाठी ।

जीवनी तूं असता संगे

क्षणो क्षणी काव्य होते

श्वासांमध्ये तुझ्या माझ्या

सदैव ते वसले होते ।

जीवनातले काव्य जरी

कायमचे तें हरवून गेले

स्मृतीरुपाने परि माझ्या

हृदयामध्यें जपुन ठेवले ।।

मला आता झोपेचा शोध नाही

मला आता झोपेचा शोध नाही
 
मला आता झोपेचा शोध नाही
आता मला रात्री जगायला खूप आवडते...

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाहीस
पण तुला देवाला मागायला खूप आवडते...


माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...

कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्ना पाहायला खूप आवडते...

तू मझा आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझा म्हणायला खूप आवडते..

मनालाही समाजावालय तू माझा नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते

तुझ हसन मी miss करतोय...

तुझ हसन मी miss करतोय...

तुझ हसन मी miss करतोय...
तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...

तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!

माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!

गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !!

प्रेम करतो तुझ्यावर...

 प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेम करतो तुझ्यावर...
सोडून मला जाऊ नकोस...

खुप स्वप्न बघितलित.....

तोडून कधी जाऊ नकोस....

कधी प्रेम करायचीस माझ्यावर...

हे कधी विसरु नकोस.....


नको करूस प्रेम...

तिरस्कार मात्र करू नकोस...

विसरलीस माझ प्रेम तरी चालेल....

मैत्री माझी विसरु नकोस.....

सोडून गेलीस तू मला....

प्रेम माझ विसरु नकोस...

मरणाच्या वाटेवर असताना...

कालजी माझी करू नकोस...

मरण जरी आल मला....

मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस..
 

पाहिलंय का ? असं प्रेमं


पाहिलंय का ? असं प्रेमं
 
पाहिलंय का ? असं प्रेमं
या जगाचं जेवढं
आयुष्यमान असेल
असं प्रेम कधीच
जगानं पाहिलं नसेल
इतकं कुणी कुणाला

वेड लावलं नसेल
इतकं अलगद काळीज
कुणी चोरलं नसेल
नुसत्या गोड हसण्यानं
इतकं कुणी फसवलं नसेल
खंर प्रेम कळत असूनही
इतकं कुणी रडवलं नसेल
केसांचा अंबाडा घालून
इतकं कुणी गुंतवल नसेल
कायमच मन अडकेल
असं जाळ कुणी टाकलं नसेल
फक्त एका कटाक्षात
इतकं कुणी जाळलं नसेल
माझ्यासारखी भुरळ पडून
कुणी कुणाचा झाला नसेल
कुणी कुणाला आजवर
इतकं झपाटलं नसेल
कुणाचंच अस्तित्व इतकं
कुणात विरघळल नसेल
कुठल्याही स्वार्थाविना
कुणाचच प्रेमं फुललं नसेल
स्वतः जळून प्रियेला
इतकं कुणी जपलं नसेल
कधीच होऊ शकणार नाही एकमेकांचे
हे पूर्ण माहित असूनही
कुणी कुणावर इतकं
प्रेमं केलं नसेल ...!!!

कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य?




कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य?

कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य?
त्याचे सप्तरंग दिसतात तरी कसे?
खरंच का हो असतात चंद्राच्या अंगावर..
पांढरे-पांढरे शुभ्र छान-छान ससे?
रंगीबेरंगी म्हणजे कशी झळकतात,
मस्त मोराची मऊ-मऊ पिसे?

सारे रंग तुमच्याच भोवती..
माझं तर आकाश पण काळंच असे...
पण नसेना का उजेड माझ्यासाठी,
त्यावाचून माझं अडतंय कुठे?
डोळ्यांनीच का पहावं सगळं?
माझी तर बोटंच झालीत माझे आरसे...
आवाजाची दुनिया तर माझीच आहे,
साथीदार आहेत कान माझे,
सारे दिसते मनास माझ्या,
हळूवार फ़क्त घ्यावे कानोसे.....
गंध भरतो रिक्त जागा,
श्वासातही परिमळ वसे..
विश्वासू हे असती सारे,
उणीव कुणाची कधी ना भासे....
अनुकंपा तर नकोच आहे..
जगणे माझे जीवनगाणे...
विझलेल्या त्या डोळ्यांतूनही,
सौंदर्याचेच दिसतील ठसे.........