रोज होतात आमच्यात छोटी मोठी भांडणं







रोज होतात आमच्यात छोटी मोठी भांडणं

रोज होतात आमच्यात
छोटी मोठी भांडणं
छान तिला जमत
मगच पुढचं उकरून काढणं

समजावून समजावून जातो

दिवस माझा मावळून
ती मात्र एकाच
विषयाला राहते धरून

नाही कधी जमले आपले
नाही कधी जमणार आपले
भांडण्यात दोघेही गुंतले
ब्रेअकप कडे येवून पोहचले

आधी पण होते समजावले
तिने मला आणि मी तिला
ब्रेअकप का नाही होते केले
नाही कळले कधी आम्हाला

भांडता भांडता गेले
दिवसा मागून दिवस
दोघातही नाही कधी आले
ब्रेअकप करण्याचे साहस

ब्रेअकप करता करता
दोघेही एकमेकांत अधिक गुंतले
नाही म्हणता म्हणता
लग्न होते आम्ही केले

प्रेम होते आम्ही केले
खेळ न्हवता मांडला
एकमेकांना समजायला
वेळ होता जरा जास्त लागला

आजही कधी कधी घेईन
घटस्पोट म्हणून भांडतो
काहीतरी आपलेच चुकले म्हणून
एकमेकांची समजूत आम्ही काढतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: