आज तो चंद्र वाटू लागला...



 
 आज तो चंद्र वाटू लागला...
 
सार्यांच्याच देखत,
मी आभाळातला चंद्र चोरला...
त्यांच्या नकळत,
त्याला मी एका बरणीत भरला...
सारेच व्याकूळ होऊन,
शोधू लागले त्या चंद्राला...

अन मी फक्त,
तिझ्या बरोबर बसून,
त्यांचा तो खेळ पाहिला....

व्याकूळ झालेली चांदणी,
शोधू लागली नभी तिच्या चंद्राला...
फिरू लागली इथे तिथे,
अन पाहू लागली,
तिच्या त्या जिवलग मित्राला...

तिची ती व्याकुळता पाहून,
हळूच तिच्या (प्रियसी) डोळ्यात पाणी साचल..
अन ज्या चंद्रासाठी,
मी तो चंद्र चोरला,
माझा तोच चंद्रा आज उदास झाला...

तिचा तो उदास चेहरा पाहून,
माझ मन हि उदास झालं...
अन फक्त तिलाच हसवण्याखातर ,
चोरलेला तो चंद्राला,
मी परत आभाळात पाठवलं...

परतलेल्या चंद्राला पाहून,
चांदणी वेड्यागत नाचू लागली...
चांदणीला नाचताना पाहून,
माझा उदास चंद्र,
आता तो ही हसू लागला...
अन आज पहिल्यांदाच,
आभाळातल्या चंद्रा पेक्षा,
मला माझा चंद्र,
खरच खूप सुंदर वाटू लागला...
खरच...
...खूप सुंदर...
आज तो चंद्र वाटू लागला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: