कविता केल्या तुजसाठी
कविता केल्या तुजसाठी
कशा लिहूं सांग मला
शब्दांमध्ये गुंफल्या तर
आवडतील कां सांग तुला ।
ना यमक ना छंद त्या
शब्द जोडतो पाठोपाठी
भावनांचा हार गुंफतो
फक्त तुझ्या स्मृतिंसाठी ।
जीवनी तूं असता संगे
क्षणो क्षणी काव्य होते
श्वासांमध्ये तुझ्या माझ्या
सदैव ते वसले होते ।
जीवनातले काव्य जरी
कायमचे तें हरवून गेले
स्मृतीरुपाने परि माझ्या
हृदयामध्यें जपुन ठेवले ।।
कशा लिहूं सांग मला
शब्दांमध्ये गुंफल्या तर
आवडतील कां सांग तुला ।
ना यमक ना छंद त्या
शब्द जोडतो पाठोपाठी
भावनांचा हार गुंफतो
फक्त तुझ्या स्मृतिंसाठी ।
जीवनी तूं असता संगे
क्षणो क्षणी काव्य होते
श्वासांमध्ये तुझ्या माझ्या
सदैव ते वसले होते ।
जीवनातले काव्य जरी
कायमचे तें हरवून गेले
स्मृतीरुपाने परि माझ्या
हृदयामध्यें जपुन ठेवले ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा