तु अजून किती रागावणार...!

तु अजून किती रागावणार...!


प्रेम करणारेही खुप आहेत
त्यात मी तर कुठेही नसणार
जरी नसलो तरी फक्त
तुझा अन तुझाच राहणार
तु अजून किती रागावणार...!!1!!

तु आता नाहीस तरी
तुला मी मनात पाहतो
तुझी प्रत्येक आठवण
रोज रोज आठवतो
तु नाही आठवले तरी
मी तुला आठवणार
तु अजून किती रागावणार...!!2!!

कधी कधी असे वाटते
तुझ्याकडे यावे
तुझ्याकडे पाहात पाहात
तुझेच होऊन राहावे
माझ्या मनीचे हे स्वप्न 
कधी पूर्ण होणार
तु अजून किती रागावणार...!!3!!

आता अजून रागाऊ नकोस
माझाही अंत पाहू नकोस
आता जर तु नाही बोललीस तर???
आता जर तर नाही घेऊन बसणार
सरळ बोलायला लागणार
सरळ बोलायला लागणार...!!4!!

तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!

तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!


तुझी गोड छबी

माझ्या डोळ्यांना भावली 

मी सूर्य तुझा 

तू माझी सावली 

तू जिथे जिथे जाशील 

तुझ्या पाठी मी येईन 

प्राण गेले तरी 

तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!

एकदा येऊन जा......

एकदा येऊन जा......

कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा......

स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता
कारण त्या स्वप्नात तू नाहीस
स्वप्नात का होईना 
एकदा येऊन जा......

हात रिकामा भासतोय मला
कारण हातामध्ये तुझा हात नाही
त्या स्पर्शामधले शहारे एकवार देऊन जा
एकदा येऊन जा.......

बंधनांच्या गर्दीत हरवून गेलीस तू त्या गर्दीत
भिरभिरल्या डोळ्यांनी शोधतोय तुला
त्या नजरेला तुझ्या दिसण्याचा आभास का होईना देऊन जा
एकदा येऊन जा ........

तुझ्या असण्याची इतकी सवय झाली होती
तू नाहीस हे आता मन मान्यच करत नाही
एकदा फक्त येऊन जा ........

त्या वेड्या मनाला हे समजावून जा ...
फक्त एकदा येऊन जा.........

जीवन....!

जीवन....!

भरभरून ओसंडून वाहणारा 
उत्साह असतो तारुण्य 
जादूमय प्रवास आनंदाचा 
अन शारीरिक, मानसिक बदलाचा…… 

होई आक्रमण या काळात 
मनावरी अनेक नव्या 
जुन्या विचारांचा……. 

ना कळे योग्य - अयोग्य 
ना ओळखता येई धोके 
डावपेच ना येई लक्षात……

सोसावे लागे दुष्परिणामाचे 
चटके घेताच जरा निर्णय चुकीचा 
अन उठे मनात वादळ वाईट विचारांचे…… 

येई अडचणीत नाव, भविष्य, 
चरित्र, कुटुंब पतप्रतिष्ठा 
मिळे धुळीस सारे……… 

होई जगणे कठीण ऐसे कि,
छळवादही समाजाचा करी 
प्रवृत्त आत्महत्येस……….

स्पर्श तो तुझा...!

स्पर्श तो तुझा....!


स्पर्श तो तुझा मोहीत करतो 

मला गंध तो

तुझा बेभान पावसात भिजवतो 

मला भुरळ पडते डोळ्यावर जाते 

मी क्षितिजावर बेधुंद हे 

माझे मन पळत सुटते 

गगनावर प्रीतीच्या त्या क्षणांची

गुंफण घालून ठेऊया या प्रेमाच्या आठवणी

मनात जपून ठेऊया तू आणि मी विश्व सगळ तिथेच थांबव

समुद्राच्या या पाण्यात आपण खूप खूप भिजावं

प्रेम कशाला म्हणतात कळण कठीण आहे

आपली ही मन वेगळी कुठे आहेत

का कळत नाही की दिवस लहान पडतो

कळूदेत या जगाला की आम्ही प्रेम करतो..♥♥

तुझ्या रंगू दे.....

तुझ्या रंगू दे.....


तुझ्या हृदयात मला
घट्ट सामावून घे

उबदार मिठीत या
आज मला वाहवून ने

आलिंगनाची साथ
अशीच काही काळ राहू दे

पाणावलेले आहेत डोळे
तुझ्या ओठात विरून दे

श्वासात जडलाय ध्यास असा
कि या क्षणीच तू जवळ घे

हातात हात देऊन
थोडस सावरून घे

रोमांचकारी क्षणात
आज मला हरवू दे

नको ना अस जाउस निघून
बाहूत तुझ्या रंगू दे.....

खरच खुप चांगला होता...

खरच खुप चांगला होता...

कधी वाटत कि,

आपण उगाचच मोठे झालो. 

कारण तुटलेली मनं आणि 

अपुरी स्वप्नं

यापेक्षा तुटलेली खेळणी

आणि अपुरा गृहपाठ 

खरच खुप चांगला होता...

टाइम पास.........!

टाइम पास........!

तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म भरला,
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मी
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला,
तर तू तुझ्या हृदयावर No vaccancy
चा बोर्ड लावला...
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर addmision
मागत होतो,
तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत external म्हणून
बसलो असतो...
.
Addmision नाही निदान Campus मधे तरी येऊ दे,
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू दे..... ♥♥

स्वप्न...!

स्वप्न...!

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात

ती फक्त पहायची असतात...

कधी कधी त्यात रंग भरायचे असतात

पण स्वप्न पुर्ण झालं नाही...

तर रडायचं नसतं रंग उडाले

म्हणुन चित्र फाडायचं नसतं...

फक्त लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसतं...

आपल्या दुःखात (कदाचित)

दुसऱ्याच सुख असतं.....

त्या आठवणी असतात ...

त्या आठवणी असतात ...


काही आठवणी आशा असतात ..

ज्या कधी विसरायच्या नसतात..

रबाराने त्या खोड़ता येत नाहित ..

कारण हाताने त्या लिहिलेल्या नसतात ......

जन्मभर राहतात त्या हृदयाच्या एक कोपरात ..

सुखदू:खात सांगड़ घालतात ..

परत त्या तशा कधी घडणार नसतात ..

म्हणून तर 

त्या आठवणी असतात ...

हो गं फक्त तू..........!!

हो गं फक्त तू..........!!


दिसली होतीस फेसबुकवर, 
एकदा मस्त स्माईल देताना, 
तेव्हा बसली होतीस, 
माझ्या मनात कुणी नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

झाली होती आपली ओळख, 
पेजवर चँटीग करताना, 
मैत्री अन् भेटी तु म्हणाली, 
मला भेट उद्या येताना..... 

हो गं फक्त तू...!! 

वाटले नव्हते असे काही, 
आपले प्रेमबंधन जुळताना, 
क्षणात बरसले होते आभाळ, 
तुला गोड लाजून पाहताना..... 

हो गं फक्त तू...!! 

बंद झाल्या आपल्या भेटी, 
दोघेही आपण भांडताना, 
अगदी वादळ शांत झाल्यावर वाटतं ना, 
तसं झालं बघ तुला भेटताना..... 

हो गं फक्त तू...!! 

एकदा विश्वास उडाला तुझा, 
कुणीतरी आपल्या दोघात चुघली लावताना, 
होऊन गेलीस क्षणात परखी, 
मला मी तुझा असताना..... 

हो गं फक्त तू...!! 

खुप काही गमावलं मी, 
तुझ्याशी नातं जोडताना, 
किती प्रेम अन् किती विनवण्या केल्या, 
तुला माझी चुक नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

केलस कायमच दूर मला, 
तुझा स्वतःवर विश्वास असताना, 
नको होती मला दुसरी कुणी, 
तू माझी पहिली झाली असताना..... 

हो गं फक्त तू...!! 

मिटले असते नसलेले वाद सगळे, 
प्रेमाने मला साँरी म्हणताना, 
केलं तुझ्यावर प्रेम मी, 
अगदीचं तुझं माझ्यावर नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

आता खुप एकटा झालोय, 
मी तु माझ्या आयुष्यात नसताना, 
मृगजळ झाली आहेस आजही, 
तू माझ्यासाठी बनलेली नसताना..... 

हो गं फक्त तू...!!.........

जगातील दोन कठीण कामे---

जगातील दोन कठीण कामे---

(1) आपल्या डोक्यातील
विचार दुस-याच्या डोक्यात
उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील
पैसा आपल्या खिशात
आणणे.
* पहिल्या कामात हुशार
त्याला 'शिक्षक' म्हणतात.
* दुस-या कामात हुशार
त्याला 'व्यापारी' म्हणतात.
* आणि दोन्ही कामात
हुशार तिला 'बायको'
म्हणतात...

इच्छा.....

इच्छा.....

खूप दिवस जाले आहेत आता आपले नाते संपून
अशीच खूप महिने अन वर्ष हि जातील
पण या आठवणी का संपत नाहीत.

का या आठवणी रोज रोज येत राहतात
त्या येताना एकट्या हि नाही येत
येताना अश्रू हि सोबत घेवून येतात

विसरली असशील तू मला
अन विचार करत असशील मी हि तुला विसरलो असेन
पण खरच मी नाही विसरलो

रोज त्याच आठवणी जगताना
रोज तेच अश्रू रडताना
मी खरच नाही कंटाळलो.

हे आयुष तुलाच दिले होते
आणि तू का अशी वागली
हेच कधी कळले नव्हते..

तू परत नाही येणार हे नक्की आहे
पण तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे.

नकळत हरवले ह्रदय माझे

नकळत हरवले ह्रदय माझे


नकळत हरवले ह्रदय माझे,
लागला माझ्या मनाला तुझा लळा.....
* * * * * * * * * *
येता जाता जाता येता,
नजरेने करतोस इशारा.....
* * * * * * * * * *
लपून छपून नको पाहूस,
भिडू दे डोळ्याला डोळा.....
* * * * * * * * * *
मनातले गुपित उघड जरा,
भरु दे नजरेशी नजरेची शाळा.....
* * * * * * * * * *
ये जवळ मिठीत घे मला,
लागू दे ओठांनी ओठावर प्रेमाचा टिळा.....
* * * * * * * * * *

a


आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

आज खरंच ना तुझी कमी जाणवली...


जीवनात टाकलेल्या प्रत्येक पावलांवरी,
नकळतपणे माझी पापणी सये पाणावली...

काळजातली एक आर्त जखम चिघळली,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

आजवर तुझ्या आठवणीची होती सावली,
सुख दुःखाच्या प्रवासात माझिया मनावरी...

तुझ्या ही सावली कुणी अनामिक गं केली,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

तु होतीस प्रतिक्षेतल्या क्षणाला सावरणारी,
वेळोवेळी मला योग्य ते मार्गदर्शन करणारी...

कुणीतरी माझ्या मनाचीच दिशा बदलवली,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

कुणीतरी आज उडवली भावनेची खपली,
अन् आसवे डोळ्यातून गं सये ओघळली...

परकेपणा अनुभवला भावनांच्या बाजारी,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

बाळासाहेबांची मुंबई ..................................!!!!!!!!!!!!!!!!!!!


मला तु थोडेही प्रेम दिले नाही......

मला तु थोडेही प्रेम दिले नाही......

काय असतो विरह,
आता काही कळत नाही.....

जीव जावा असे काही,
हल्ली घडत नाही.....

तडकलेल्या ह्रदयाचे,
अधुन मधुन चुकतात ठोके.....

जे आता पहिल्यासारखे,
कधीच स्पंदत नाही.....

उरले शेवटचे दोन क्षण हे,
जे अजुनही संपत नाही.....

चुकलो तर मीच होते तेव्हा,
तु कुठेच चुकली नाही.....

मी सर्वस्व मानले तुला,
मला तु थोडेही प्रेम दिले नाही......

आकर्षण आणि प्रेम..

आकर्षण आणि प्रेम..


आकर्षण आणि प्रेम..

यात एक रेघ असते.. 

पुसट की ठळक ... 

ती आपण मारायची असते.. 

प्रेमाकडे जाणारा रस्ता 

आकर्षणाच्य ा बोगद्यातून जात ही असेल... 

पण त्या गहि-या मोहजालात 

तुला तुझा मार्ग खरच का गवसेल?? 

आकर्षणाला प्रेम समजून 

आपण उगीच वाहून जातो.. 

पण. थोड्याच दिवसानी कळत... 

खरतर अस काहीच नव्हत.. 

म्रुगजळाच् या मागे उगीच धावत असतो.. 

पण तो तर फ़क्त एक आभास असत

तू ......

तू ...... 


तू ...... 

तू नाजूक अश्या कळी सारखी....

....पाऊसाची भरडी थेंबे सोसणारी

काट्यांमध्ये राहून खूप हसणारी....

....उन्हाची तीव्र झळ ग्रह्णारी

तू नाजूक अश्या कळी सारखी....

....भोवरऱ्याची भून भून दिन रातऐकणारी

हिरवळ चादरेच्या अंगणी वाढणारी....

....स्वतःची नवी ओळख जणू देणारी

तू नाजूक अश्या कळी सारखी....

....येणाऱ्या जाणाऱ्यांना मस्तवाटणारी

प्रत्येकाला खूपच छान हसवणारी....

....नुस्त पाहताच भरपूर बोलणारी

तू नाजूक अश्या कळी सारखी....

....मराठमोळ्या एटेत उभी राहणारी

मुक्तपणे वाऱ्यासंगे डौऊलनारी....

प्रत्येकाच्या ह्रिदयात बसणारी..... 

....नाजूक अश्या कळी सारखी....

जिवापाड प्रेम आहे......!

जिवापाड प्रेम आहे......!


ती मी दिलेल्या सर्व आठवणी,
पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझ्या पासुन खुप लांब,
जाण्याचा प्रयत्न करतेय..!! 

पण मला माहीत आहे,
ती मला मनातुन काढुचं शकत नाही..
कितीही प्रयत्न केले तरी,
ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! 

मला माहीत आहे,
मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..
तीला आश्रुं देताना,
मी पण खुप रडलोय..!! 

म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे,
कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम
जिवापाड प्रेम आहे..!!

हे आपला अबोल प्रेम..

हे आपला अबोल प्रेम..


हे आपला अबोल प्रेम..

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातl

पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम

पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम

प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली

... पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श

पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???

तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी

पण पायात अडकली आहे करियरची बेडी

हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे

पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे...

मी तुझा ...

मी तुझा ...


अजून नाते नाजूक आहे 
अजून हळव्या भेटी गाठी 
मी तुझा श्वास होऊनी 
जगतो आहे तुझ्याच साठी 

प्रीत गहिरी रंग गहिरा 
भाव बोलका थांग गहिरा 
गहिरे इतूके नयन तुझे 
गूढ कळेना जसे मीनाक्षी 
तीन अक्षर मनात लिहिले 
हृदयाची रंगली पाटी
अजून नाते नाजूक आहे 
अजून हळव्या भेटी गाठी

रोज कविता लिहायची आहे......

रोज कविता लिहायची आहे......


दबक्या पावलाने गुपचुप येउन
गालावर तुझ्या किस करायचा आहे...
गुलाबाचे लाल् फ़ुल
हळुच तुझ्या केसात लावायचे आहे...

गालावर तुझ्या किस करताना
गुदगुल्या तुला करायच्या आहे...
तुझे माझ्या कडे लक्ष नसताना
एकटक तुझ्याकडे पहायचे आहे....

तुझ्याकडे पाहत, हळुच हसत
तुलाही हसताना पहायचे आहे...
हसतानाचे तुझे मधुर सौंदर्य
र्हदयाच्या कप्प्यात साठवायचे आहे..

तुझे बोलने, तुझे हसणे
मनात कैद करुन ठेवायचे आहे..
प्रत्येक जन्मी फ़क्त तुझ्यावारच
प्रेम करत रहायचे आहे...

तु पुढे चालताना मागे
तुझी सावली बनुन चालायचे आहे..
क्षणो-क्षणी तुझी आठवन काढत
रोज कविता लिहायची आहे..

एकटा होतो तेच बर होतो.......... :(

एकटा होतो तेच बर होतो.......... :(




एकटा होतो तेच बर होतो
तुझ्यावर प्रेम केल आणी वेडा झालो 

चित्त माझ ऊडल त्याला तुच
कारणीभुत आहेस
कारण तुझ्या हसण्यात अशी 
जादु आहे की वेड करेल एखाद्याला
ईतकी ताखद आहे

तुझा चेहरा काही केले नजरेआड 
जात नाही,
राञीला झोप आणी दीवसाला चैन 
पडत नाही,

कारण तुझे सौंदर्यच असे 
नझर खीळणारं आहे की, 
कुणीही तुझ्या प्रेमात 
पडल्याशिवाय राहत नाही..

आजकाल मी तुझ्यात 
असा गुंततो आहे की, 
मनात स्वप्नात तुझच 
चित्र रेखाटतो आहे....

रोज तो आकाशातला 
चंद्र ऊजळ वाटायचा 
आज तो ही फिका वाटत आहे,
कारण त्या चंद्रापेक्षा 
ऊजळ तुझा चेहरा वाटत आहे...

माहीत नाही तुला पण हे सार 
माझं तुझ्यावरचं प्रेम आहे
कारण हे तुला 
समजण खुप कठीन आहे

प्रेम करतो तुझ्यावरच 
हे सिध्ध कसे करु
गुलाबी कागदावर लिहू 
का रक्ताने ऊमटउन देऊ

वेड प्रेम माझं
तुला कधी कळेल,
विरहात तुझ्या 
तडफडुन जेव्हा मी मरेल..

तुझ्याही डोळ्यातुन 
मग अश्रु गळु लागेल,
जेव्हा प्रेत माझ सरणावर 
जळताना तुला दिसेल....

विसरून जातो..

विसरून जातो..


तीचं नाव लीहून-लीहून
पुसायला विसरून जातो..

तीची जेव्हा आठवण काढतो
विसरायला विसरून जातो..

खुप काही सांगायचं असतं तीला
जे हृदयात आहे..

पण.. जेव्हा पण भेटतो
ऐकवायला विसरून जातो..

आता तिच्या शिवाय
दिवस सरता सरत नाही..

पण.. नेहमी स्वप्नात तीला
हे सांगायचं विसरून जातो..

माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते
विसर तीला आता..

पण.. सकाळ झाली की..
तीला विसरायचं

मी मात्र इथेच असेन....

मी मात्र इथेच असेन....


रहा नेहमी सुखाच्या घरातच तू,

दूर या दुखांच्या बाजारातून….

मी मात्र इथेच असेन…..

अलवार गुलाब-कळ्यांच,

असेल तुझ राज्य….

आणि बोचणाऱ्या काट्यांच,

माझच असेल साम्राज्य….

या काट्यांच्या साम्राज्यात,

घायाळ नि रक्तबंबाळ….

मी मात्र इथेच असेन….

असेल तुझा प्रत्येक क्षण सुंदर,

अन सुखांनीच थाटलेला…..

सभोवती असेल माझ्या,

फक्त अंधारच दाटलेला….

काळोखाच्या त्या वेलींनी वेढलेला….

मी मात्र इथेच असेन….

आठवण येईल कधी माझी,

होईल इच्छा मनाची,

वळून पाहण्याची,

मी मात्र इथेच असेन…

मी मात्र इथेच असेन....

विसरु नकोस तू मला...

विसरु नकोस तू मला...


विसरु नकोस तू मला
इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला
नहीं जमल फुलायाला
हरकत नाही

कोमेजुन मात्र जावू नकोस
माझ्या प्रीत फुला
इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला
नाही जमणार परत कधी भेटायला
नाही जमणार एकमेकांना पहायला
हरकत नाही



इतकेच सांगणे आहे तुला
टालू नकोस तू मला
शेवटचच आहे हे भेटण
घडणारच आहे ह्रुदयाचे
तीळ तीळ तुटण
नियतीनेच ठरविले आहे
आपल्याला असे लुटण

इतकेच सांगणे आहे तुला
जपुन ठेव आठवणीना
नाही नियमितपणे त्यात
रमता आले हरक़त नाही

पण विसरु नकोस तू मला...

पण विसरु नकोस तू मला...

श्वासाचा अंत होई पर्यंत......

श्वासाचा अंत होई पर्यंत......




खूप वाईट घडलं आपल्यात,
मलाही माहित आहे,
म्हणून तू मला विसरून जाणे,
हे चूकीचे आहे ना गं.....

आपणचं ठरवलं होत ना गं,
कधीचं सोडायची नाही,
साथ एकमेकांची.....

पण ???

आयुष्यात कुठे काय,
ते मोठे वादळ आले,
अन्, आपल्याला एकमेकांपासून,
दूर करून गेले.....

कधीतरी विचार कर गं परत येण्याचा,
मी नाही काही बोलेन तुला,
तू फक्त माझ्याकडे,
येण्याचा प्रयत्न तर कर.....

मी स्विकारेन तुला,
सगळ्या दुःखा सहीत,
नको देऊस सुख मला.....

पण ???

असा एकटा तरी,
नको सोडून जावूस मला
माहीत आहे गं मला,
तू फार जिद्दी आहे.....

नाही येणार तू परत,
तरी मी वाट पाहिन तुझी,
या श्वासाचा अंत होई
पर्यंत......

Missing Uh Sweetheart .... 

मी तुझ्याशिवाय जगूचं शकत नाही.....

मी तुझ्याशिवाय जगूचं शकत नाही.....




तु फक्त माझी आहेस,

तुला कुणा दुस-यासोबत,

मी बघूचं शकत नाही.....


तु फक्त माझीचं राहशील,

तुझ्यापासून दुर राहणे,

मनाला सहनचं होत नाही.....


तु फक्त माझीचं होशील,

तुला आठवल्याशिवाय,

माझा एकही क्षण जात नाही.....

तु फक्त माझ्याशीचं बोलवं,

तु दुस-यासोबत बोललेलं,
मला मुळीचं पटत नाही.....


तु फक्त मलाचं बघत राहावं,

तु दुस-याकडे बघितलेलं,

हे मला खरचं बघवतचं नाही.....

तु किती रे छळतेस या जिवाला,

तु छळल्याशिवाय ह्रदय माझं,

खरचं धडकतचं नाही.....


तु फक्त माझ्यावरचं,

प्रेम करत रहावं.....


कारण ???


मी तुझ्याशिवाय जगूचं शकत नाही.....

मला तिला Propose करायचय...

मला तिला Propose करायचय...


मला तिला Propose करायचय...
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ...
.
...... मला तिला सांगायच्ya तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही ...
माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..
.
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू ...
.
मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील का म्हणू ..
.
मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू ..कि ...
तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..
म्हणू तर काय म्हणू ???